Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"जीआर सरसकट आरक्षण देणारा नाही, जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाणार"

"जीआर सरसकट आरक्षण देणारा नाही, जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाणार"

मुंबई : खरा पंचनामा 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला आहे.

भुजबळांशी स्वतःची चर्चा झाल्याचं सांगून ते नाराज नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. "कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधी आणणार नाही. हा जीआर सरसकट आरक्षण देणारा नाही, जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, तसेच या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचंही फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. ओबीसीना सुद्धा माहित आहे जो पर्यंत हे राज्य आहे तो पर्यत ओबीसीवर अन्याय होणार नाही. एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार असं होणार नाही. मराठ्यांच मराठ्यांना देणार ओबीसच ओबीसीना देणार

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.