मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, शिवसेना (उबाठा) आक्रमक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आता या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
सध्या अनेक शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जमा झाले आहेत. काही शिवसैनिक हे या पुतळ्याची साफसफाई करताना दिसत आहे. या घटनेनंतर खासदार अनिल देसाई यांनी पोलीस आणि सरकारी यंत्रणा काय करतेय असा आरोप केला आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर सकाळी १० वाजता लाल रंग फेकण्यात आल्याची घखटना घडली. यावेळी त्यांच्या पुतळ्यावर आणि पुतळ्याच्या आजूबाजूला रंग पडला होता. यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेत शिवाजी पार्क परिसरात जमायला सुरुवात केली. यावेळी काही आंदोलकांनी पुतळ्याची सफाई केली. त्यावरील शाई काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रचंड मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.