Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मोदी माझे शिष्य ? झोप झाली आहे ना तुमची?"

"मोदी माझे शिष्य ? झोप झाली आहे ना तुमची?"

कोल्हापूर : खरा पंचनामा

नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मी देखील त्यांना पत्र लिहिलं, अभिनंदन केलं.

आम्ही सगळे जण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलंही राजकारण आम्ही आणत नाही. अनेकांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही. असं शरद पवार म्हणाले. दरम्यान या उत्तराच्या आधी एक किस्सा घडला तो महत्त्वाचा आहे.

पत्रकार परिषदेसाठी शरद पवार कोल्हापुरात आले तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला शरद पवार साहेब, तुमचे शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस झाला, तुम्ही.. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच शरद पवारांनी पत्रकाराला थांबवलं आणि विचारलं मोदी माझे शिष्य? झोप झाली आहे ना तुमची? हे पत्रकाराने विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावं हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे. ज्या काही जाहिराती आल्या त्यात वर्तमानपत्रांना आनंद असतो. एकनाथ शिंदेंनी जाहिराती दिल्या असतील ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे असं शरद पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.