मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणासाठी यापूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर आता फडणवीस सरकारने आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9 कोटी 60 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.
मराठा आंदोलनात एकुण 254 जणांचा मृत्यू झाला होता. यातील 96 मृतांच्या नातेवाईकांना काल 9 कोटी 60 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर याआधी 158 मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जरांगे पाटालांकडून हैदराबाद गॅझेटसह सातारा गॅझेटचीदेखील मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता सातारा गॅझेटसाठीदेखील शासनदरबारी वेगवाग हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. तर शिंदे समितीच्या अहवालाबाबतदेखील आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा, अशा आशयाचे आदेश मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.