'स्मार्टकाॅप्स हॅकथाॅन २०२५' मध्ये पीव्हीपीआयटी बुधगाव काॅलेज सर्वसाधारण विजेते
नाविण्यपूर्ण पोलिसिंग, सार्वजनीक सुरक्षेसाठी सांगली पोलीस दलाचा उपक्रम
सांगली : खरा पंचनामा
पोलीस विभागाला काम करताना येणाऱ्या दैनंदिन समस्यांवर व्यवहार्य उपाय शोधण्यासाठी तसेच पोलिसांची कार्यप्रणाली बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यातूनच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या संकल्पनेतून सांगली पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्मार्टकाॅप्स हॅकथाॅन २०२५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पीव्हीपीआयटी बुधगाव काॅलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये नानासाहेब महाडीक इंजिनिअरिंग काॅलेज, पेठ, पीव्हीपीआयटी, बुधगाव, संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, मिरज, वालचंद काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग, सांगली, अण्णासाहेब डांगे काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग आष्टा, आरआयटी इस्लामपूर या महाविद्यालयांनी भाग घेतला होता. या संघांनी पोलिसांनी दिलेल्या सहा विषयांवर नाविण्यपू्र्ण साॅफ्टवेअर्स, अॅप्स बनवून त्याचे तज्ज्ञांच्या समितीसमोर सादरीकरण केले. यामध्ये व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम या विषयात पीव्हीपीआयटी बुधगावने प्रथम आणि द्वितीय तर नानासाहेब महाडीक काॅलेजने तृतीय क्रमांक पटकावला. सर्च अॅण्ड अॅनालाईज सोशल मिडिया विषयात पीव्हीपीआयटी बुधगावने प्रथम तर महाडीक काॅलेजने द्वितीय क्रमांक पटकावला. वुमेन सेफ्टी कंपॅनियन चॅटबाॅट विषयात पीव्हीपीआयटीने प्रथम, वालचंद काॅलेजने द्वितीय तर पीव्हीपीआयटीने तृतीय क्रमांक पटकावला. मशीन लर्निंग बेसड सिस्टीम टू डिटेक्ट फिशिंग युआरएल विषयात महाडीक काॅलेजने प्रथम तर वालचंद काॅलेजने द्वितीय क्रमांक पटकावला. सिनिअर सिटीझन स्कॅम शिल्ड विषयात डांगे काॅलेजने प्रथम क्रमांक पटकावला. कंम्प्लेंट, अॅप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम विषयात पीव्हीपीआयटीने प्रथम, वालचंदने द्वितीय तर डांगे काॅलेजने तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्यांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, सतीश आलदर, करण परदेशी, रूपाली पवार, रेखा कोळी, विवेक साळुंखे, इम्रान मलकारी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अभिजित पाटील, अजय पाटील, दीपाली नेटके, शांता कोळी, सलमा इनामदार, सुजाता साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.