Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांना धक्के मारून बाहेर काढलेभाजप मंत्र्याशी जमीनीचा वाद चिघळला

माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांना धक्के मारून बाहेर काढले
भाजप मंत्र्याशी जमीनीचा वाद चिघळला

धुळे : खरा पंचनामा

जमीनीच्या वादातून माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांचा अपमान करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडली आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या तब्बल 33 एकर जमीनीवर मंत्री जयकुमार रावल कुटुंबाने कब्जा केल्याचा पाटील कुटुंबीयांचा आरोप आहे.

हे प्रकरण कोर्टात होते. कोर्टानेही माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या बाजून निर्णय दिला. त्यामुळे या जमीनीचा ताबा घेण्यासाठी पाटील कुटुंबीय गेले होते. त्याच वेळी तिथे असलेल्या रावल समर्थकांनी त्यांना तिथून पिटाळून लावले. त्यांना त्यांच्याच जागेत येण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे जमीनीचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कोर्टाने आपल्याबाजूने निर्णय दिल्यानंतरही रावल कुटुंब असे वागत असल्याचा आरोप आता पाटील कुटुंबाने केला आहे.

या जमीन वादा प्रकरणी रावल कुटुंबाने दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. धुळे न्यायालयात याची सुनावणी झाली. त्यानंतर निकाल देण्यात आला. कोर्टाने या जमीन व्यवहारात कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे ही जमीन पाटील कुटुंबाचीच असल्याचा निकाल दिला. या विरोधात आता जयकुमार रावल यांचे कुटुंबीय मुंबई उच्च न्यायालयात अपिलात गेले आहे. मात्र या जमीन विवादाचा निकाल आपल्या बाजूने लागल्याने पाटील कुटुंबिय खुश होते. त्यांनी या जमीनीचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते त्या ठिकाणी गेले होते.

जवळपास 33 एकर जमीनीवर रावल कुटुंबीयांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप पाटील कुटुंबाचा आहे. दरम्यान माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे किशोरसिंग दिलीपसिंग पाटील यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी रावल कुटुंबीय व त्यांच्या समर्थकांनी त्यांना या ठिकाणाहून हाकलून लावले होते. शिवाय जमीनीत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पाटील कुटुंबीयां विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्हा न्यायालयाने प्रतिभा पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर रावल कुटुंबीयांना हा चांगलाच दणका मानला जात आहे. आता या निकालानंतर जयकुमार रावल यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वडिलोपार्जित असलेल्या जमिनी संदर्भात काय निकाल येतो हेच पाहणं महत्त्वाच असणार आहे. दरम्यान रावल यांचे वकील ए.बी. शहा यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. पाटील आणि रावल कुटुंबाचे चांगले संबंध होते. ही जमीन पाटील यांनी रावल यांना दिली होती. या दोघांत तीस लाखांत सौदाही झाला होता असा दावा शहा यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.