भांडण सोडवायला गेला अन जीवाला मुकला
चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू : अंकलीत तणावपूर्ण शांतता
सांगली : खरा पंचनामा
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकूने भोसकण्यात आले होते. अंकली (ता. मिरज) येथे ही घटना घडली होती. या जखमी तरुणाचा सोमवारी रात्री उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून सांगली ग्रामीण पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास बंडूघळगे (वय ३५), क्षितिज ऊर्फ आप्पाशशिकांत कांबळे (वय २८), आदित्य शंकर घळगे (वय २२, सर्व रा. अंकली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणुक सुरू असताना दोन गटात भांडण झाले होते. यावेळी शीतल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला असताना त्याला हल्लेखोरांनी चाकूने भोसकले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शीतलचा उपचारादरम्यान सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी, पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
शितलचे पार्थिव आज मंगळवारी सकाळी अंकली गावात नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते. शीतलची अंत्ययात्रा गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध केलाय. या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी या तिघाना अटक केली आहे. तसेच, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
