अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास सक्त मजुरीची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
मुरमुरे आणायला गेलेल्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास .द.वि. कलम ३५४, ३५४ (ए), व बाल लैंगिक अत्याचार कलम ८ नुसार एक वर्ष सक्त मजुरी व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद, भा. द. वि. कलम ३५४ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद त्याबरोबर बाल लैंगिक अत्याचार कलम ८ मध्ये तीन वर्ष सक्त मजुरी व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय क्र. ४ च्या न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी ही शिक्षा सुनावली.
तिमाप्पा अंजनेया कवाडी (वय ३०, रा. डोम तुंगीमानदाल्म पागद्राई, ता. पट्टणकोडा, जि. करनूल, राज्य- अंध्रप्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दि. ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी पिडीत मुलगी सकाळी ०९.४५ च्या सुमारास मुरमुरे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तिमाप्पा कवाडी हा मुरमुरे विकत होता. पिडीतेने आरोपी याला पाच रुपये देवून मुरमुरे देण्यास सांगितले त्यावेळी आरोपी ने पिडीता ही आरोपीला पैसे देत असताना तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे सदरची पिडीता रडत रडत आल्या आईकडे गेली व तिने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यावेळी पिडीतेच्या आईने पळत जावून ओरोपीच्या शर्टच्या कॉलरला पकडले व आरडा ओरडा केला त्यामुळे शेजारील लोक गोळा झाले त्यावेळी पिडीतेने व पिडीतेच्या आईने झालेली घटना जमलेल्या लोकांना सांगितली व त्यातील एकाने पोलीस ठाणेला फोन केला त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले व आरोपीला पकडून पोलीस ठाणे येथे घेवून गेले. त्यानंतर पिडीतेच्या आईने मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारीमध्ये पिडीतेच्या जबाब व तक्रार सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी पिडीतेचा जबाब प्रश्न उत्तर स्वरुपात नोंदवून घेतला. त्यानंतर या गुन्हयाचा तपास करण्यात आला. यामध्ये घटनास्थळ पंचनामा करुन घटनास्थळावरुन मुरमुरे जप्त करण्यात आले. याकामी घटनास्थळा जवळील शेजारी असणा-या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. पिडीतेचे तपासणी मिरज ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली. याकामाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक जे. ए. पवार यांनी केला. त्यानंतर आरोपी विरुध्द आरोप पत्र दाखल करण्यात आले,
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून आरती आनंद देशपांडे (सातविलकर) यांनी काम पाहिले. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण मान साक्षीदार तपासण्यात आले. याकामी पिडीतेचा जबाब, तिच्या आईचा जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचबरोबर आरोपीला ताब्यात घेतलेले पोलीस कर्मचारी यांचा कोर्टापुढील जबाब याचा विचार आणि सरकारी वकीलांनी केलेला अंतिम युक्तीवाद याचा विचार करुन आरोपीला वरील सर्व गुन्हयामध्ये दोषी धरुन त्याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आलेली आहे.
याकामी मिरज शहर पोलीस ठाण्यातील शशिकांत पाटील, सांगली पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, रेखा खोत, सुनिता आवळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. सरकारी वकीलांनी शिक्षेच्या मुद्दयावर युक्तिवाद करीत असंताना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी त्याचबरोबर समाजामध्ये अशा विकृत व्यक्तींच्या गुन्हयाला आळा बसावा व पिडीतेला योग्य तो न्याय मिळावा अशी कोर्टाला विनंती केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.