सांगलीतील सराईत गुन्हेगार सलीम मुजावर हद्दपार
सांगली : खरा पंचनामा
सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराला सांगली जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
सलीम मकबुल मुजावर (वय ४६, रा. सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली) असे हद्दपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. सलीम मुजावर याच्यावर सरकारी नोकरावर हल्ला करणे, खंडणी, मारामारी, गंभीर दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्यास हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस निरिक्षक संजय मोरे आणि सध्या अतिरिक्त कार्यभार असणारे पोलिस निरिक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्याचे अवलोकन करुन सलीम मुजावर यास एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे निर्देश अधिक्षक घुगे यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.