Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेनेच्या मंत्र्यांचे निकटवर्तीय दोन दिवसांपासून बेपत्ता

शिवसेनेच्या मंत्र्यांचे निकटवर्तीय दोन दिवसांपासून बेपत्ता

जळगाव : खरा पंचनामा

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय ज्यांच्याखांद्यावरती विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेच संजय पाटील आता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध लागलेला नाही, नेमके बेपत्ता झाले किंवा कोणी त्यांना लावून पळून नेले? याची शहानिशा पोलीस करीत आहे. जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे.

संजय लोटन पाटील असं बेपत्ता झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव आहे. ते मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी आहेत. मात्र सध्या ते धुळे येथे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्याहून गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत.

संजय पाटील यांच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार 2000 दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी जळगाव शहरातील काही भागातील सीसीटीव्ही देखील बघितले. गोलाणी मार्केट रोडवर संजय पाटील हे शेवटचे दिसले. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले. यात संजय पाटील यांनी शहरातील एका बँकेतून काही पैसे काढले, त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसले दरम्यान, त्यांचे दोन्ही मोबाइल बंद झाले असून ते बेपत्ता झाले आहेत. संजय पाटील यांचे कोणा अपहरण केले किंवा संजय पाटील हेच स्वतः मोबाईल बंद करून बेपत्ता झाले असावे याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.