Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाकाबंदी दरम्यान पोलिसांवर हल्ला, उपनिरीक्षक जखमीसहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद, दोघांना अटक

नाकाबंदी दरम्यान पोलिसांवर हल्ला, उपनिरीक्षक जखमी
सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद, दोघांना अटक

कांदिवली : खरा पंचनामा

नाकाबंदीदरम्यान, पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई रोखण्यासाठी सहा जणांनी पोलिसांना अडथळा निर्माण करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना आकुर्ली रोडवरील बिग बाजार सबवे परिसरात रात्री उशिरा घडली. 

तक्रारदार पोलीस हवालदार सिद्धार्थ किनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अजय रमेश बामणे हे मद्यप्राशन करून आले होते. यादरम्यान, कारवाई सुरू असताना त्याचे सहकारी विद्या सोनावणे, विजया भट, वर्षा बामणे आणि गणेश बामणे यांनी एकत्र येऊन पोलिसांना अडवले. पोलिसांना अरेरावी केली.

यावेळी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली, तसेच उपनिरीक्षक गरड यांना नखाने ओरखडे काढत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 189 (2), 189(3), 190, 115(2), 352, 125, 281 तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम 181, 184, 185 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अजय बामणे आणि गणेश बामणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.