माजी आमदार बच्चू कडू, उन्मेष पाटलांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : खरा पंचनामा
शेतकरी जनआक्रोश मोर्चात चिथावणीखोर भाषण आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बेकायदा घुसून पोलिसांना धक्काबुक्की केल्याने माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी प्रश्नावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी जिल्हाधिकारी यांनी नाकारल्याने माजी खा उन्मेश पाटील, बच्चू कडू यांच्या सह मोठा जमाव पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घुसला.
यावेळी गदारोळ उडाल्याचे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू, माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह १३ जणांविरुद्ध जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
यांच्यावर गुन्हा दाखल अॅड. जमील देशपांडे, गुलाबराव वाघ, शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, संग्रामसिंग सूर्यवंशी, प्रमोद पाटील, बाळासाहेब पवार, विजय राठोड, कुलभूषण पाटील, संदीप पाटील, सुनील देवरे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.