बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन
मुंबई : खरा पंचनामा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यातील वातावरण पेटलं असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पवार गटामध्ये मोठी नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला. अश टीका करणं योग्य नाही, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, असं पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितल्याचे समजते.
गोपीचंद पडळकरांवरील कारवाईबाबात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.