Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नेपाळमध्ये माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

नेपाळमध्ये माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा
पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत



काठमांडू : खरा पंचनामा 

फेसबुक अन् इन्स्टाग्रामसारख्या २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली अन् नेपाळमधील तरूणाचा उद्रेक झाला. संतप्त झालेले Gen Z रस्त्यावर उतरले अन् आपला विरोध दर्शवला. संतप्त झालेल्या तरूणांकडून संसदेला घेराव घालण्यात आला, त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केल्यानंतर तरूणाई आणखी आक्रमक झाली. त्यांचा उद्रेक उडाला. काठमांडूसह इतर शहरात जाळपोळ, तोडफोडी घटनांनी नेपाळ पेटलं. हजारो युवक रस्त्यावर उतरले. तरूणांचा उद्रेक पाहून नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. पण तरूणांचा उद्रेक काही थांबला नाही. तरूणांकडून दुसऱ्या दिवशी आणखी आक्रमक पवित्रा घेण्यात आली. संतप्त जमावाने माजी मंत्र्याचे घर पेटवलं. राष्ट्रपती भवनावरही कब्जा केला आहे. या घडामोडी घडत असताना नेपाळच्या गृहमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांसह आतापर्यंत १० जदणांनी राजीनामा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत आहेत.

देशातील तरूणाचा उद्रेकानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. नेपाळी मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, केपी शर्मा दुबाईला जाण्याच्या तयारीत आहे. उपचारासाठी शर्मा देश सोडत आहेत, पण त्यांच्या वेळेमुळे तर्कवितर्क लावले जात आहे. नेपाळमध्ये तरूणांचा उद्रेक उडाला, हिंसाचार भडकला असताना पंतप्रधान देशाबाहर जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केपी शर्मा देशाबाहेर जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यांनी खासगी प्लेनही तयार ठेवलेय. ते कोणत्याही क्षणी देश सोडू शकतात.

सोमवारी रात्री नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. त्यामुळे आंदोलन शांत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण नेपाळमधील तरूणाई दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरली. काठमांडू आणि आजूबाजूच्या शहरातील जमाव हिंसक झाला होता. दोन दिवसांतील परिस्थितीमुळे नेपाळमधील दहा मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये गृहमत्री, आरोग्य मंत्री यांनीही राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

नेपाळमधील रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी आंदोलक आणखी उग्र झाले. त्यांनी माजी मंत्र्यांचे घर पेटवलेच. काँग्रेसच अध्यक्षांच्या घरातही आग लावली. केपी शर्मा ओली यांच्या सरकारला काँग्रेसचे समर्थन होते. त्यामुळे संतापलेल्या तरूणाईने अनेक नेत्यांची घरे पेटवली आहेत.

नेपाळमध्ये जेव्हापासून लोकशाही आली, तेव्हापासून आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याशिवाय कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. केपी शर्मा यांचे सरकार काँग्रेस अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांच्या पाठिंब्यावर उभं होतं. आंदोलनकर्त्यानी काँग्रेस अध्यक्षांचे घर पेटवलं. हिंसक जमाव पाहून आता पंतप्रधानही देश सोडण्याच्या तयारीत आहेत. इतकेच नाही तर नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांच्या खासगी घरावरही कब्जा करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.