देशातील आणखी एका राजकीय घराण्यात कलह; वडिलांनी केली मुलीची हकालपट्टी
हैद्राबाद : खरा पंचनामा
देशातील राजकीय घराण्यांमधील बेबनाव किंवा कलह नवीन नाही. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीतमध्येही असेच वितुष्ट निर्माण झाल्याने वडिलांनी आमदार असलेल्या मुलीला पक्षातून निलंबित केले आहे. यातून के. चंद्रशेखर राव यांच्या घराण्याची कौटुंबिक कलह असलेल्या राजकीय नेत्यांच्या यादीत भर पडली.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करीत पक्षाचे कार्याध्यक्ष आणि सख्खे बंधू के. रामाराव यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी तोफ डागली होती. नव्याने आत्ये बंधू व माजी मंत्री हरिश राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेलंगणातील कलमेश्वर उपसा सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचारावरून कविता यांनी हरिश राव यांना जबाबदार धरले होते. कविता यांच्या गंभीर आरोपांनंतर तेलंगणातील काँग्रेस सरकारने या प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या चंद्रशेखर राव यांनी कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली.
काही महिन्यांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आपले थोरले चिरंजीव तेज प्रसाद यादव यांना पक्षातून तसेच कुटुंबातून निलंबित केल्याची घोषणा केली. यानंतर कविता यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.. दिल्ली मद्य घोटाळ्यात कविता यांना ईडीने अटक केली होती. सुमारे वर्षभर तुरुंगात राहिल्यावर त्यांची जामिनीवर सुटका झाली. विधान परिषदेत गटनेतेपदी डावलले गेल्याची कविता यांची भावना आहे. तसेच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन तेलुगू भाषक राज्यांमध्ये भाऊ-बहिणीचा वाद समोर आला आहे. आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला यांनी भावाच्या विरोधातच भूमिका घेतली होती. शर्मिला सध्या काँग्रेसच्या नेत्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.