Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाचअधिकाऱ्यांसाह तिघे निलंबित

पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
अधिकाऱ्यांसाह तिघे निलंबित

गुरुग्राम : खरा पंचनामा

रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांकडून कागदपत्रांच्या नावाखाली चिरीमिरी घेणाऱ्या प्रोग्राममधील पोलीस कर्मचाऱ्याने हद्दच केली. भारत बघण्यासाठी आलेल्या जपानच्या एका पर्यटकाकडून 1 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी झोन ऑफिसर, एक पोलीस कर्मचारी आणि एका होमगार्डला डीसीपी डॉ. राजेश मोहन यांनी निलंबित केले आहे.

जपानी नागरिक केल्टो यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले की, गुरुग्राम पोलिसांनी पावती न देता 1 हजार रुपयांची लाच घेतली. पोस्ट शेअर करताना केल्टो यांनी लिहिले, 'व्वा! गुरुग्राम पोलिसांनी जपानी पर्यटकाकडून 1 हजार रुपयांची लाच घेतली. या अशा पोलिसांमुळे भारताची प्रतिमा खराब होते.' हा व्हिडीओ व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली.

डीसीपी ट्रॅफिक डॉ. राजेश मोहन यांनी तातडीने कारवाई करत यात सहभागी असलेल्या तिघांनाही निलंबित केले. यामध्ये झेडओ ईएसआय करण सिंह, हवालदार शुभम आणि होमगार्ड भूपेंद्र यांचा समावेश आहे. लाचखोरीविरुद्ध पोलिसांचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करत तिन्ही ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे डीसीपी ट्रॅफिक डॉ. राजेश मोहन म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.