Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस असल्याची बतावणी करत दिल्लीतील ज्वेलर्स लुटून कामगाराचे अपहरण करणाऱ्या सांगलीतील दोघांना अटक१४०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदी, १२ लाखांची रोकड जप्त ः सांगली एलसीबीची कारवाई

पोलीस असल्याची बतावणी करत दिल्लीतील ज्वेलर्स लुटून कामगाराचे अपहरण करणाऱ्या सांगलीतील दोघांना अटक
१४०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदी, १२ लाखांची रोकड जप्त ः सांगली एलसीबीची कारवाई

सांगली : खरा पंचनामा

दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील फर्शबझार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलिस असल्याची बतावणी करत दुकानातील सोन्याचे दागिने, बिस्किटे, तीन किलो चांदी आणि रोकड लुटणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत १४०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदी, १२ लाखांची रोकड असा १.६५ कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

प्रशांत राजकुमार कदम (वय २५, रा. उपळावी रोड, सोनी, ता. मिरज), शुभम राजाराम कांबळे (वय २६, सध्या रा. आरग, मूळ रा. कळंबी ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. १५ सप्टेंबर रोजी दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील फर्शबझार येथील भोला ज्वेलर्स या दुकाना संशयित शिरले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत २० लाखांची रोकड, १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि तीन किलो वजनाची चांदी लुटून दुकानातील कामगाराचे अपहरण करून गेले होते. संशयितांचा शोध घेत दिल्ली पोलीस सांगलीत पोहोचले. एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी संशयितांना शोधण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते.

पथकातील सुशील मस्के, अभिजित माळकर यांना तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही संशयित सोनी आणि आरग येथे असल्याची माहिती मिळाली. एलसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने तेथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लपवून ठेवलेली १२ लाखांची रोकड, १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, बिस्किटे, तीन किलो चांदी असा मुद्देमाल जप्त केला. दोघांनाही दिल्ली क्राइम ब्रॅंचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील, दिल्ली क्राइम ब्रॅंचचे उपनिरीक्षक अमित चौधरी, शशिकांत यादव, संदीप पाटील, अतुल माने, सुशील मस्के, अभिजित माळकर, श्रीधर बागडी, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.