शिरोळच्या शिक्षकांची गहाळ झालेली रोकड विश्रामबाग पोलिसांनी बारा तासात शोधून केली परत!
सांगली : खरा पंचनामा
शिरोळ येथील शिक्षकांची सांगलीत प्रवासात 90 हजारांची रोकड गहाळ झाली होती. पोलिसांनी तातडीने हालचाली करत बारा तासात ती रोकड त्या शिक्षकांना परत केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
शिरोळ येथील शिक्षक राम पांडुरंग माने मंगळवारी रात्री दिल्ली येथून रेल्वेने सांगली स्थानकावर उतरले. तेथून रिक्षाने घरी गेले. घरात गेल्यावर 90 हजारांची रोकड असलेली बॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. ती बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांनी सांगितले. निरीक्षक भालेराव यांनी तातडीने एक पथक तयार करून रिक्षा शोधण्याच्या सूचना दिल्या. पथकाने माहिती घेतल्यावर ती रिक्षा मिरज येथील मलिक. मुलाणी याची असल्याचे समजले. मुलाणी याला रिक्षा घेऊन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. रिक्षाची तपासणी केल्यावर त्यात रोकड असलेली बॅग सापडली.
त्यानंतर निरीक्षक सुधीर भालेराव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावून ती बॅग परत केली. विश्रामबाग पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.