गणेश विसर्जन, ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परीक्षेत्रात तगडा पोलीस बंदोबस्त
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
पहा व्हिडीओ
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्यात शनिवारी अनंत चतुर्दशी असून या दिवशी मोठया प्रमाणात गणरायांचे विसर्जन केले जाते. तसेच शुक्रवारी ईद ए मिलाद असून या दोन्ही सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परीक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक, सार्वजनिक मंडळानी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा, सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत असून सोशल मीडियावर चोवीस तास वॉच ठेवण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, सण उत्सव पार्श्वभुमीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या अनुषंगाने मोका प्रस्तावास कलम वाढ करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. यापुढेही ०२ (एकूण २३ आरोपी) मोका प्रस्तावांना मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे. जातीय व धार्मिक तणावाच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव दरम्यान गोपनीय यंत्रणा सतर्क आहे. सोशल मिडीया मॉनिटरींग २४ x ७ सुरु आहे. विनापरवानगी व ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारे सर्व लाऊडस्पिकर ध्वनी वर्धक यांचे विरुध्द पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मानक प्रणाली प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काळात अवैध भोंगे, डॉल्बी, डीजे यांचे नॉईजलेवल रिडींग घेण्यात आले असुन, त्याचे विरुध्द न्यायालयामध्ये खटले पाठविण्याची कारवाई सुरु आहे.
उत्सव कालावधी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करुन उप विभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखामार्फत उपविभाग निहाय कॅम्पचे आयोजन करुन विशेष कार्यकारी दंडाधिकारी / अपर पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक, यांचेमार्फत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. उपद्रवमुल्य निर्माण करणाऱ्या व्यक्ती त्यांची नावे व त्यांच्या सध्य परिस्थितीतील हालचाली याबाबत सविस्तर अद्यावत माहिती घेवुन उत्सव काळात अश्या व्यक्ती उपद्रव देणार असल्याचे समजुन आल्यास त्यांचेवर योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करणे सुरु असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
सण उत्सवाचे काळात अंमली पदार्थ विरोधात प्रभावी कारवाई करण्यात आली. यामध्ये वडगाव पोलीस ठाणे येथे ७७.४५ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण घटकात १.८१ कोटी किंमतीचा ७९३.५५ किलो ग्रॅम गांजा तसेच १०.३७ लाख किंमतीचे १७ ग्रॅम एम डी जप्त केले आहे. चंदगड पोलीस ठाणे येथे १३.५० लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. यापुढे ही निरंतर कारवाई सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले.
अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याकरीता स्थायी मुव्हमेंट ऑर्डर तयार आहे. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी मिरवणुक मार्गाची स्वतः पाहणी केलेली आहे, मार्गामध्ये येणारे अडथळे विद्युत तारा, अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे यामुळे रहदारीस व वाहतुकीस अडथळा होणार नाही याप्रमाणे नियोजन केले असून स्थानिक स्वराज्य संस्था यांना सुध्दा यामध्ये अंतर्भुत करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर अतिरिक्त मनुष्यबळाची तरतूद करुन स्ट्रायकिंग पथक तैनात करण्यात आले आहे. ठिक ठिकाणी साध्या वेषातील पोलीसांचा (स्त्री-पुरुष) यांचा पुरेसा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. निर्भया पथक, छेडछाड विरोधी पथक, डायल ११२ यांची विशेष गस्त राहणार आहे.
इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांसमोर संमिश्र वस्ती असलेल्या क्षेत्रांत मिरवणुक रेंगाळत ठेवणे, गुलाल उधळणे, आक्षेपार्ह गाणी वाजविणे, घोषणा देणे याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंगल विरोधी कवायती घेवुन कोणत्याही दंगलसदृश्य परिस्थिती हाताळण्यास दंगल विरोधी पथक सुसज्ज आहे. मिश्र वस्तीत या सणाचे निमीत्ताने अनुचित घटना घडणार नाहीत याकरीता जादा बदोबस्त ठेवून सक्त पेट्रोलिंग सुरु असल्याचे फुलारी यांनी सांगितले.
बंदोबस्ताकरीता तैनात सर्व अधिकारी अंमलदार यांचे भोजन व जलपान याची व्यवस्था केलेली आहे. बंदोबस्तावरील अधिकारी/ अंमलदार यांनी मिरवणूक कालावधीत संपर्क राखण्यासाठी अद्ययावत वॉकी टॉकी पूरविण्यात आलेले असल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.