'आधी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, पण आता....'
पुणे : खरा पंचनामा
'आधी आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. मात्र, आता आपल्यालाच आपल्यावर पांघरून घालावं लागतंय,' असं वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे चुलते आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची आठवण काढल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार आज (ता. 26) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्थानिकच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
तर राष्ट्रवादी पक्षातील फुटी संदर्भातील घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, 'मागचा आणि आताचा अजित पवार यात लय मोठा फरक आहे. त्यामुळे माझ्याकडे यायला संकोच करू नका.' अजितदादा असं म्हणताच एकच हशा पिकला.
त्यानंतर ते म्हणाले, 'आपण आधी काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. पण आता आपल्यालाच पांघरून घालावं लागतंय. जसं वय वाढतं तसं बदलावं लागतं. वय वाढलं की मॅच्युरिटी येते.' तर शरद पवारांचा साहेब असा उल्लेख अजितदादांनी करताच एक एक कार्यकर्ता 'दादा चुलता पुतण्याचं नात' असं म्हटला. त्याला उद्देशून अजित पवार म्हणाले, 'मला चुलता पुतण्याचं काही सांगू नको, आधीच्याही नको आणि आताच्याही चुलता पुतण्याचं काही सांगू नको,' त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका. कुणी काही वक्तव्य करतात ते वाईट बोलले म्हणून आपण वाईट पद्धतीने उत्तर द्यायचं ही आपली शिकवण नाही. राजकारण सुसंस्कृतपणाने करण्याचा विचार जपा. लोक काही बोलतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा आणि पुढे निघून जा, महत्व देऊ नका, असं सल्लाही अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.