लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
दिल्ली : खरा पंचनामा
लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. काल (दि.25) हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख एनजीओची एफसीआरए नोंदणी रद्द करण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वांगचुक यांना पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे. लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील तरुण रस्त्यावर आले होते. ते तरुण हिंसक झाले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद होऊन हिंसा उसळली. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर केंद्र सरकारने या हिंसेप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.