बहुचर्चित गुटखा तस्करी प्रकरणातील पंढरपूर, सांगोल्यातील तिघांचा अटकपुर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
कोल्हापूर : खरा पंचनामा
११ लाखाच्या गुटखा साठा प्रकरणी संशयित बोलेरो पीक अपचा मालक योगेश महादेव मिसाळ (रा. पंढरपूर), अभिजित सूर्यकांत मस्के व दिलीप रामचंद्र मस्के दोघेही (रा. सांगोला जि. सोलापूर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी फेटाळला. अतिरिक्त सरकारी वकील प्रियंका राणे-पाटील यांचा जोरदार युक्तिवाद व त्यांनी या खटल्यात केलेल्या सन २०२१ व २०२३ मधील खटल्याचे न्याय निवाड्यांच्या आधारे उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.
अतिरिक्त सरकारी वकील प्रियंका राणे-पाटील यांनी मागील विविध खटल्यांची माहिती देत योगेश मिसाळ याला यापूर्वी गुटखा तस्करी प्रकरणी अटक होऊन जामीनावर बाहेर आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच संशयित मिसाळ जामिनावर येऊन तोच उद्योग करीत असल्याचा युक्तिवाद करुन त्याच्या सोबतच यातील आणखी दोन संशयित अभिजित मस्के आणि दिलीप मस्के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. त्यावर खंडपीठाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन संशयित योगेश मिसाळ, अभिजित मस्के व दिलीप मस्के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अखेर फेटाळून लावला. त्यामुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी बोलेरो पिकअप टेम्पो (एमएच ४५ एएक्स ०५३९) पकडला होता. वास्तविक या पिकअपचा क्रमांक एमएच १० डिटी ४५१७ असा आहे. या पिकअपच झडती घेतली असता त्यामध्ये अकरा लाख वीस हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी योगेश महादेव मिसाळ (रा. पंढरपूर), अभिजित मस्के, दिलीप मस्के यांच्यावर गुन्हा दाखल केला होता व मिसाळ फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठांमध्ये अर्ज केला होता. अखेर हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.