Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास सश्रम कारावासाची तसेच दंडाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास सश्रम कारावासाची तसेच दंडाची शिक्षा

सांगली : खरा पंचनामा

खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विटा येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी ही शिक्षा सुनावली. दंडातील 20 हजारांची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही दिला. सरकारी वकील म्हणून अॅड. आरती एम. साटविलकर, अॅड. अनिल एन. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

संतोष उर्फ राजू माणिक पाटोळे (वय २९, रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी पिडीता ही दुध डेअरीतून दूध घालून एकटीच घरी जात असताना भिकवडी रोडवरील पुलाचे वरील बाजूस आरोपी हा पिडीतेशी झोंबाझोंबी करुन तिला शेतामध्ये ओढत नेण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पिडितेने तात्काळ विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार त्याच्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे यांनी केला. या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यामध्ये त्यांनी घटनास्थळावरुन पिडीतेच्या हातामध्ये असलेली दुधाची किटली जप्त केली. त्याचबरोबर या कामातील महत्वाचे असलेले साक्षीदारांचे तपासटिपणे देखील या कामात नोंदवली. आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले. याचे कामकाज पहिल्यांदा सांगली सेशन कोर्ट येथे चालले होते. त्यानंतर विटा सेशन कोर्टमध्ये सदरचे कामकाज चालले. याकामी सरकारपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. याकामी पिडीतेचा जबाब त्याचबरोबर तिच्या नातेवाईकांचा जबाब सरकारपक्षाच्या वतीने झालेला आहे. या कामातील दूध डेअरी मालकांचा ही जबाब पिडीतेच्या जबाबाशी पुरक झालेला आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी पिडीता ही अल्पवयीन होती हे दाखविण्यासाठी सरकारपक्षातर्फे पिडीता ज्या शाळेमध्ये शिकत होती त्या शिक्षकांचाही जबाब याकामी झालेला आहे. या मे. कोर्टासमोर झालेल्या जाबजबाबावरुनआरोपी याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दोषी धरण्यात आले.

शिक्षेच्या मुददयावर सरकारी वकील आरती एम. साटविलकर यांनी युक्तीवाद केला. यामध्ये पिडीता ही अल्पवयीन आहे याची जाणीव आरोपीला असतानाही त्याने असा गंभीर गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्याला कोणतीही सहानुभूती मिळू नये, त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व आरोपीला जास्तीत जास्त दंड करण्यात यावा व झालेल्या दंडाची रक्कम मदत म्हणून पिडीतेला देण्यात यावी अशीही विनंती कोर्टाला केली. कोर्टासमोर झालेला पुरावा सरकारी वकील आरती एम. साटविलकर यांचा झालेला युक्तीवाद याचा विचार करुन आरोपी याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

सदरकामी, कोर्ट केसमध्ये विटा पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस शिपाई निलम नागेश जगदाळ व महिला पोलीस शिपाई भाग्यश्री मारुती नांगरे, त्यावेळी विटा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सपोनि प्रकाश सिताराम निकम, सांगली पैरवी कक्षातील सुनिता कांबळे व रेखा खोत यांनी मदत केली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलीसांचे सहकार्य मिळाले. पीडितेचा विनयभंग केल्या प्रकरणी व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ नुसार आरोपीला दोषी धरणेत आले. त्यानंतर त्याला भा.दं.वि. कलम ३५४ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ नुसार ४ वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद एकूण दंड रुपये ३० हजार झाला असून त्यातील २० हजार रुपये पिडीतेला देण्याबाबत आदेश देऊन शिक्षा सुनावण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.