तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीला कोण जबाबदार?
पोलीस महासंचालक म्हणाले...
चेन्नई : खरा पंचनामा
तमिळनाडूतील करूर येथे शनिवारी झालेल्या निवडणूक सभेत अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून 51 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीस जबाबदार कोण याबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहेत. करूरमधील या घटनेवर तमिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी. वेंकटरमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यात 12 पुरुष, 16 महिला आणि 10 मुले (पाच मुलगे व पाच मुली) यांचा समावेश आहे.
वेंकटरमण यांनी सांगितले की घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यापूर्वी टीव्हीकेच्या सभांमध्ये तुलनेने कमी गर्दी होत असे, मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त लोक उपस्थित होते. आयोजकांनी करूरमध्ये मोठ्या मैदानाची मागणी केली होती आणि साधारण 10,000 लोक येतील अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात जवळपास 27,000 लोक जमले. विजय यांना संबोधित करायच्या ठिकाणी 500 हून अधिक पोलीस तैनात होते.
वेंकटरमण यांनी सांगितले की सभेसाठी दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिली होती; मात्र गर्दी सकाळी 11 वाजल्यापासूनच यायला सुरुवात झाली होती. विजय संध्याकाळी 7:40 वाजता पोहोचले, तेव्हा गर्दी तासन्तास अन्न-पाण्याविना थांबली होती, ही वस्तुस्थिती आहे. विजय यांनी स्वतः पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं पण पक्षकार्यकर्त्यांनी गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यायला हवी असा आग्रह धरला. याचा अर्थ असा नाही की पोलिसांनी 27,000 लोकांच्या बरोबरीने फोर्स ठेवावा. या दुर्दैवी घटनेची कारणे चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होतील. एक सदस्यीय आयोग आधीच स्थापन केला गेला आहे. तोपर्यंत या प्रकरणावर मी अधिक काही बोलू शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख (Tamilaga Vettri Kazhagam, TVK) विजय यांच्या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रॅली दरम्यान अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि नागरिक बेशुद्ध पडले. तर काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.