Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणारगणेश मंडळ उद्योगपतींकडून हायजॅक, मनसेचा आरोप

मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार
गणेश मंडळ उद्योगपतींकडून हायजॅक, मनसेचा आरोप

मुंबई : खरा पंचनामा 

लालबागचा राजा गणेश मंडळात आता गरबा पाहायला मिळेल, अशी जहरी टीका मनसेनं केलीय. त्याला कारण ठरलंय लालबागच्या राजाचं उद्योगपतींकडून सुरू असलेलं ब्रँडिंग. एवढंच नाही तर लालबागच्या राजा चरणी आयोजकांकडून सर्वसामान्यांना एक तर श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जातोय.

लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना कशी वागणूक दिली जातेय. यामुळेच अनेक वर्षांपासून लालबागचा राजा मंडळाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जातोय. कधी कार्यकर्त्यांची तर कधी सुरक्षा रक्षकांकडून मुजोरी आणि धक्काबुक्की सुरु असते.

त्यात आता आणखी एक भर पडलीय ती म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या ढिसाळ नियोजनाची. पिढ्यान पिढ्या कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं तराफ्यामार्फत विसर्जन केलं जातं. मात्र यंदा गुजरातहून आणलेल्या नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

अखेर कोळी बांधवांचा मान उद्योगपतींना दिला गेल्याने हळुहळू या ब्रँडिंगचं लोण सगळ्याच गणेश मंडळांपर्यंत पोहचणार का आणि देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सवाची मराठी अस्मिता जपण्याऐवजी उद्योगपतींच्या वर्चस्वातून मराठी अस्मिता ठेचली जाणार. याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.