Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

बिहार एसआईआरवरून सुरू असलेल्या वादादरम्यान बुधवारी निवणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमवर आता उमेदवाराचे नाव आणि चिन्हासोबत त्याचा कलर फोटो देखील असेल. याची सुरूवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, एकाच नावाच्या उमेदवारांमुळे मतदारांचा अनेकदा गोंधळ उडतो. यामुळेच आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे नाव आणि चिन्हासोबत कलर फोटो देखील लावण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना त्यांच्या आवडत्या उमेदवाराला योग्यरित्या ओळखता येईल आणि त्यांना मतदान करता येईल.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, उमेदवारांचे कलर फोटो आता ईव्हीएम मतपत्रिकेवर छापले जातील. यामुळे त्यांची ओळख अधिक स्पष्ट होईल. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे चेहरे फोटोच्या जागेच्या तीन चतुर्थांश जागा व्यापतील. ज्यामुळे त्यांचे चेहरे अधिक स्फष्ट होतील.'

याव्यतिरिक्त, सर्व उमेदवार आणि NOTA अनुक्रमांक ईव्हीएमवर ठळक अक्षरात छापले जातील. त्याचा फॉन्ट आकार ३० असेल. त्याशिवाय सर्व उमेदवारांची नावे आणि NOTA एकाच फॉन्टमध्ये आणि आकारात छापले जातील. जेणेकरून मतदारांना ते वाचणे सोपे होईल. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकांसाठी एक मानक वजन देखील निश्चित केले आहे. हे मतपत्रके ७० जीएसएम असतील.

विधानसभा निवडणुकांसाठी विशेष गुलाबी कागद वापरला जाईल. निवडणूक आयोग आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसह हे बदल लागू करत आहे. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ही प्रक्रिया वापरली जाईल. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.