Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांचा रिमार्क "Not Available", तरीही निलेश घायवळला मिळाला पासपोर्ट

पोलिसांचा रिमार्क "Not Available", तरीही निलेश घायवळला मिळाला पासपोर्ट

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. लंडन गेल्याची माहिती समोर येत आहेत. त्याला यासाठी पासपोर्ट कसा मिळाला? राजकीय वरदहस्त मिळाला का? की पोलिस दलांतूनच मदत झाली? यावर काथ्याकूट सुरू आहे.

यातच त्याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शन संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर पोलिस दलाचे अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला आहे.

पुण्याचा गुंड निलेश घायवळ याचे मुलं लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तशी पुणे पोलिस दलाचे उपायुक्त संभाजी कदम यांनी या माहिती दुजोरा दिला. त्यामुळे निलेश घायवळ हा लंडनलाच गेल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील त्याच्या घरावर छापा घालून तिथून दोन अलिशान वाहनं जप्त केली आहेत. तरी प्रश्न येतो, परदेशात जाण्यासाठी निलेश घायवळ याचे पासपोर्ट व्हेरिफेक्शन झाले कसे? पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी त्याचा शोध सुरू आहे, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, निलेश घायवळ याने पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी अहिल्यानगर शहरातील माळीवाड्यातील त्याचा जुना पत्ता दिला होता. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर करताना, त्याने अहिल्यानगर शहरातील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड असा पत्ता दिला होता. यानंतर अर्ज पडताळणीसाठी हे प्रकरण अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्याकडे आले.

कोतवाली पोलिस ठाण्याकडे त्याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी 23 डिसेंबर 2019 रोजी ऑनलाईनपद्धतीने अर्ज आला. कोतवाली पोलिसांनी या अर्जावर पडताळणी केली. तसेच अर्जदाराशी संपर्क देखील केला. पत्त्यावर चौकशी केली, तर तिथं देखील कोणी आढळून आलं नाही. यामुळे कोतवाली पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत सदरचे पासपोर्ट प्रकरण 16 जानेवारी 2020 रोजी प्रतिकूल म्हणजेच "Not Available" रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असताना, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.