ZP, पंचायत समिती निवडणूक सोपी राहिली नाही, ३ कोटी अन् १०० बोकड...
बुलढाणा : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर स्था झालेल्या नाहीत पण राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. स्थानिक पातळीवरचे कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि यात होणाऱ्या खर्चाबाबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलंय. या निवडणुकीत इतका खर्च होतो की कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो असंही ते म्हणालेत.
युतीबाबत भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले की, आम्ही शिवसेना - भाजप युतीला प्राधान्य देणार आहे. आम्हाला भाजप-शिवसेना अशी युती हवीय आणि ती प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे. आमदारकीला, खासदारकीला युती करतो आणि जेव्हा लहान कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी निवडणुकीसाठी खर्च करून मातीत जायचं का? असा प्रश्न उपस्थित केला.
लहान कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला खर्च झेपणार नाही. त्यामुळे युती झाली पाहिजे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका सोप्या राहिल्या नाहीत. एक ते दोन-तीन कोटी इतका खर्च करावा लागतो. याशिवाय काही ठिकाणी शंभर बोकडं कापली जातात. इतक्या खर्चाने निवडणुकीत कार्यकर्ता उद्धवस्त होतो असंही संजय गायकवाड म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.