इन्सुली येथे गोवा बनावटीची दारू जप्त : दोघांना अटक
वाहनासह 1.08 कोटींचा मुद्देमाल जप्त : अधीक्षक कीर्ती शेडगे
सिंधुदुर्ग : खरा पंचनामा
जिल्ह्यातील इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारे वाहन पकडून राजस्थान, उत्तरप्रदेश येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहनासह 1.08 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.
रामनिवास (वय 25, रा. भाखरा राम, माणकी, तह. गुडामालानी, माणकी, बाड़मेर, राजस्थान), नूर आलम (वय 26, रा. हबिब अहमद, पितईपूर, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या वाहने तपासून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सिंधुदुर्गच्या प्रभारी अधीक्षक शेडगे यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (GJ-10-Z-9984) ची तपासणी केल्यावर गोवा बनावटी विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली.
च्या प्रत्येकी 48 सिलबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या भरलेले असे एका मोठ्या पुठ्याच्या बॉक्समध्ये 04 बॉक्स प्रमाणे एकुण मोठ्या 375 बॉक्समध्ये भरलेले एकुण 1500 कागदी पुठ्ठयाचे बॉक्स (72000 बाटल्या) असा अवैध मद्यसाठा मिळून आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी 93.60 किंमतीचे गोवा बनावटीचे मद्य, कंटेनर, दोन मोबाईल असा एकुण 1 कोटी 08 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली धंनजय साळुंखे, विवेक कदम, रणजीत शिंदे, दिपक वायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री, सागर सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.