पोलिस महानिरीक्षकांच्या आत्महत्येचे गुढ वाढले; 9 पानी सुसाईड नोट अन् लाच प्रकरणातून खळबळजनक खुलासे
चंडिगड : खरा पंचनामा
हरियाणाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय पुरण कुमार यांनी चंडिगड येथील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचं कारण सुरुवातीला स्पष्ट नव्हतं, मात्र नंतर सापडलेल्या नऊपानी सुसाईड नोट आणि मृत्युपत्रामुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
लाच प्रकरणात अडकल्यामुळे वाय पुरण कुमार यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी त्यांची आयएएस पत्नी जपानच्या सरकारी दौऱ्यावर असताना १७वर्षीय लेकीला बाबा मृतावस्थेत आढळले.
हाताने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांच्या मते वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येस रोहतक येथील भ्रष्टाचाराचे प्रकरण कारणीभूत असू शकते.
हरियाणाचे पोलीस महासंचालक (आयजीपी) वाय पुरण कुमार यांचा मृतदेह निवासस्थानी आढळल्यानंतर चंडिगड पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी मृत्युपत्र आणि नऊ पानांची सुसाइड नोट जप्त केली. पोलिसांनी या नोटमधील मजकूर उघड केला नसला तरी, हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या नऊ पानांच्या नोटमध्ये हरियाणातील काही अधिकाऱ्यांची नावे आहेत.
हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, आत्महत्येचे संभाव्य कारण रोहतक येथे नोंदवलेले एक भ्रष्टाचार प्रकरण असू शकते. या प्रकरणात, एक्झेंम्प्टी सहायक उपनिरीक्षक (EASI) सुशील कुमार यांच्यावर एका दारु कंत्राटदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. रोहतकचे पोलीस अधीक्षक (एसपी) नरेंद्र बिजारनिया यांनी सांगितले की, ईएएसआय सुशील कुमार यांनी आयजी पुरण कुमार यांच्या वतीने कंत्राटदाराकडे २.५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी आयजी पुरण कुमार हे रोहतक रेंज पोलीसचे प्रमुख होते.
"दारू कंत्राटदार दोन महिन्यांपूर्वी आयजींना भेटले होते आणि अधिकाऱ्याने त्याला सुशील कुमार यांच्याशी सहकार्य करण्यास सांगितले होते" असे एसपींनी सांगितले. सुशील कुमार यांना सोमवारी अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांनी आयजींच्या सूचनेवरुन पैसे गोळा करत असल्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी लाच वाटाघाटींचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावेही सादर केले आहेत.
"कबुलीजबाबमध्ये सुशील यांनी पोलिसांना सांगितले की पुरण कुमार यांनी त्यांच्या वतीने पैसे गोळा करण्यास सांगितले होते. रोहतक येथील अर्बन इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली सुशील कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्याकडे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहेत ज्यात सुशील कुमार हे रोहतकच्या माजी आयजींच्या वतीने कंत्राटदाराकडून लाच मागत आहेत" असे एसपींनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.