कोल्हापूर जिल्ह्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
शिवाजीराव गायकवाड शिवाजीनगर, रविराज फडणीस वडगावला
कोल्हापूर : खरा पंचनामा
पुणे ग्रामीण पोलीस दला पाठोपाठ कोल्हापूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. शिरोळचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांची इचलकरंजीच्या शिवाजीनगरचे तर कुरुंदवाडचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांची वडगावला बदली करण्यात आली आहे.
बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे :
निरीक्षक प्रविण विठ्ठल खानापुरे (जिल्हा विशेष शाखा ते शिरोळ), निरीक्षक शिवाजीराव गायकवाड (शिरोळ ते शिवाजीनगर), निरीक्षक गजेंद्र प्रल्हाद लोहार (कागल ते नियंत्रण कक्ष, कोल्हापूर), निरीक्षक गंगाधर धोंडीभाऊ घावटे (जिल्हा विशेष शाखा ते कागल), निरीक्षक मानसिंह श्रीनिवास खोचे (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा पारपत्र), सपोनि आप्पासो नामदेव बाबर (वाचक शाखा ते पन्हाळा), सपोनि दिपक रामचंद्र कदम (जयसिंगपूर पोलीस ठाणे ते कळे पोलीस ठाणे), सपोनि संतोष महादेव माने (वडगांव पोलीस ठाणे ते कुरुंदवाड पोलीस ठाणे), सपोनि रविराज अनिल फडणीस (कुरुंदवाड पोलीस ठाणे ते वडगांव पोलीस ठाणे), सपोनि रणजित हणमंतराव पाटील (कळे पोलीस ठाणे
ते राजारामपूरी पोलीस ठाणे), सपोनि सरीता मनोज पाटील (सरीता महादेव लायकर) (अर्थिक गुन्हे शाखा ते वाचक शाखा).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.