तालिबान सरकारच्या मंत्र्याची दिल्लीत पत्रकार परिषद, महिला पत्रकारांना बंदी
दिल्ली : खरा पंचनामा
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानच सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेत. याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुतक्की भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.
या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार महिलांवर लावलेल्या कठोर निर्बंधामुळे ओळखलं जातं. महिलांना काम करण्यापासूनही रोखलं जातं. याशिवाय तालिबान सरकारकडून मानवाधिकाराचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांना संरक्षण दिलं जात असल्यानं जगभरातून त्यांच्यावर टीका होत असते.
दिल्लीत शुक्रवारी एस जयशंकर आणि मुतक्की यांची बैठक झाली. या बैठकीकडे भारत आणि तालिबान सरकारच्या संबंधातील बदलाचं एक रुप म्हणून पाहिलं जात आहे. भारताने घोषणा केलीय की काबुलमधील टेक्निकल मिशनला दुतावासात अपग्रेड केलं जाईल. याचं अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वागत केलं. एस जयशंकर म्हणाले की, भारत अफगाणिस्तानच्या स्वायत्तता, अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या टेक्निकल मिशनला दुतावासाचा दर्जा देण्याची घोषणा आम्ही करत आहोत. ही घोषणा करताना मला आनंद होतोय.
एस जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दुपारी अफगाणिस्तानच्या दिल्लीतील दुतावासात मुत्तक्की यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यात महिला पत्रकारांना सहभागी होऊ दिले नाही. यानंतर अनेक पत्रकारांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. इतकंच नाही की सर्व महिला पत्रकारांनी ड्रेस कोडचा आदर केला होता.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्तक्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्ही लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना जागा देत नाही. या संघटनांकडून भारतावर अनेक हल्ले केलेत. पाकिस्तानलासुद्धा आवाहन करतो की त्यांनीही दहशतवादी संघटनांना बळ देऊ नये. आमच्याकडे यांच्यातला एकही नाहीय आणि एक इंचही जमीन त्यांच्या ताब्यात नाहीय. अफगाणिस्तानने जसं शांततेसाठी दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली तशी इतरांनीही केली पाहिजे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.