Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील 3 विमानतळांना मिळणार नवीन ओळखमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब

महाराष्ट्रातील 3 विमानतळांना मिळणार नवीन ओळख
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील 3 मोठ्या विमानतळांना नवीन ओळख मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या 3 विमानतळांच्या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यात नवी मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या विमानतळांचा समावेश आहे.

या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह पुण्यातील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे. इतर राज्यातील देखील प्रस्ताव मान्यतेसाठी प्रतिक्षेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.