Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदेंचे OSD मंगेश चिवटेंच्या भावावर प्राणघातक हल्ला

एकनाथ शिंदेंचे OSD मंगेश चिवटेंच्या भावावर प्राणघातक हल्ला

करमाळा : खरा पंचनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे.

माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचे दिग्विजय बागल हे पुत्र असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून रिंगणार होते. तर, त्यांची बहीण रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महेश चिवटे हे करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेले असता त्यांच्यावर रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी हल्ला केल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. या घटनेनंतर महेश चिवटे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, हल्ल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी दाखल होत सदर घटनेचा तपास सुरू केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.