वृद्धाच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांसह तिघांना अटक
4.05 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वृद्धाच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4.05 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
प्रेम दिपक कांबळे वय २१), तुषार शहाजी कांबळे (वय १९, दोघे रा. खोची फाटा, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर), आकाश प्रकाश टिबे, (वय २२, रा. मु. पो. नाईकबा मंगल कार्यालयजवळ, गोटखिंडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी गोटखिंडी येथील भीमराव पाटील रस्त्याने चालत जात असताना. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केले होते. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे एक पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना काही तरुण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील टोल नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गोटखिंडी येथे एका वृद्धाच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 4.05 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, अरुण पाटील, उदयसिंह माळी, अतुल माने, रणजीत जाधव, शिवाजी शिद, सुरज थोरात, रोहन घस्ते, पवन सदामते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, अशोक जाधव, सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी, अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.