पुणे रेव्ह पार्टी प्रकरण : दीड तासांपासून रोहिणी खडसेंची चौकशी
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी कथित रेव्ह पार्टी करताना दोन महिन्यांपूर्वी रंगेहात पकडले होते. प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. प्रांजल खेवलकर यांच्यावर सतत वेगवेगळे गंभीर आरोप केले जात होते. रेव्ह पार्टीप्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यासह इतरांना जामीन काही दिवसांपुर्वी जामीन मंजूरही करण्यात आला, मात्र यांतर आता प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून गेल्या दीड तासांपासून चौकशी सुरू आहे. प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस पाठवली होती.
प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस पाठवली होती. दरम्यानच रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी गेल्या दीड तासांपासून चौकशी सुरू आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाकडून सध्या रोहिणी खडसे यांची दोन तासांपासून चौकशी सुरू आहे. प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. आता या प्रकरणात पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी करण्यात आली आहे.
प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवालात आला असून त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले की, प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. त्यानंतर ही नोटीस रोहिणी खडसे यांना पाठवण्यात आली. अमली पदार्थ विरोधी विभागाकडून रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरू आहे. यादरम्यान कार्यालयात जात असताना त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.