Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीच्या तोंडावर 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणुकीच्या तोंडावर 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे आरक्षणाचे सोडत काढण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील एम. देवेंद्र सिंह, शेखर सिंह यांच्यासहित इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आलीये. शेखर सिंह यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकाल पूर्ण झालाय. महापालिकेत कार्यरत असताना शेखर सिंह यांचे अनेक निर्णयामुळे वादात सापडले होते. त्यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

मात्र निवडणुकीच्या तोंडावर शेखर सिंह यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आलीये. तर महामेट्रोचे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे नागपूरचा कार्यभार सुपूर्द करण्यात आलाय.

बदली झालेले अधिकारी : 
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोळते यांची पुणे साखर आयुक्त या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.