Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात होणार मोठा बदल!

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात होणार मोठा बदल!

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात लवकरच महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आयोजित मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पोलिसांच्या बुटांबाबत प्रश्न उपस्थित केला, ज्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदलाचे संकेत दिले.

अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांच्या रचनेवर भाष्य केले. सध्याचे टाचांचे बूट धावपळ आणि पाठलाग करताना पोलिसांना अडथळा ठरतात. क्रीडापटूंप्रमाणे हलके आणि पळण्यास सोयीचे बूट उपलब्ध झाल्यास पोलिसांचे कार्यक्षमतेत वाढ होईल, असा मुद्दा त्याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा गांभीर्याने ऐकून घेतला.

गृहमंत्री पदाची जबाबदारी संभाळणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी अक्षयच्या सूचनेचे स्वागत केले. आतापर्यंत पोलिसांचे बूट संचलनासाठी वापरले जात असल्याने त्यांच्या डिझाइनकडे विशेष लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, अक्षयने उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगत, पळण्यास सोयीचे बूट देण्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला नव्या बुटांच्या डिझाइनसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. अक्षयच्या सूचनेमुळे पोलिसांच्या गणवेशात कार्यक्षमता वाढवणारा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पोलिसांना हलके आणि वेगवान पळण्यास उपयुक्त बूट मिळू शकतील.

पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा तातडीने धावपळ करावी लागते. सध्याचे बूट त्यांच्या गतीवर मर्यादा आणतात. नव्या डिझाइनचे बूट पोलिसांना अधिक चपळ आणि प्रभावी बनवतील, असे अक्षयने नमूद केले.

या बदलामुळे महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश आधुनिक आणि कार्यक्षम होईल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे संकेत देत पोलिसांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित केल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो, असे मत व्यक्त करण्यात येतंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.