तपासातील कागदपत्रांमध्ये फेरफार : पोलिस निरीक्षक निलंबित
नाशिक : खरा पंचनामा
सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संबंधित एका गुन्ह्याच्या तपासातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
जळगाव येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संबंधित प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या अखत्यारीत होता. तथापि, नाईकवाडे काही दिवस रजेवर असताना, तपासाशी संबंधित कागदपत्रे व रजिस्टर अशोक गिरी यांनी कोणतीही नोंद न करता तसेच वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मागवून घेतल्याचे निष्पन्न झाले. कागदपत्र व रजिस्टर यामध्ये त्यांनी फेरफार केल्याचेही पुढे उघड झाले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान संबंधित कागदपत्रे व रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा सविस्तर अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडून पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
अहवालाची खातरजमा केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. अशोक गिरी हे यापूर्वी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची सरकारवाडा पोलिस ठाण्यात दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र, बदली झाल्यापासून ते रजेवर होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.