गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना याबाबत उत्तर देण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा निलेश घायवळचा युकेमधील व्हिसा आहे. मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची माहिती युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना उत्तर दिले आहे. युके हाय कमिशनने निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे युकेमध्ये निलेश घायवळ कुठे लपून बसला आहे याची देखील माहिती लवकरच समोर येईल.
निलेश घायवळला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे पोलिसांनी युकेच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन त्याला ताब्यात घ्या अशी मागणी केली. निलेश घायवळला अटक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला युके हाय कमिशनने उत्तर दिले आहे. घायवळ लंडनमध्येच आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.