कसबे डिग्रज येथील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुणवंत प्राध्यापकांचा विशेष सत्कार
सांगली : खरा पंचनामा
संस्थापक प्राध्यापक डीडी चौगुले यांना ए पी टी आय मुंबई यांच्यातर्फे फार्मसी शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्वोत्तम शिक्षक, प्राचार्य व संस्थापक हा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सत्कार केला.
डॉ. संतोष गेजगे यांची हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका येथे शिष्यवृत्तीसह पेटंट अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक डॉ बाळासाहेब चोपडे यांनी विशेष अभिनंदन केले.
डॉ. अजित दळे विभाग प्रमुख रसायनशास्त्र यांनी अल्झायमर्स व्याधीवर नवीन रसायने औषधे शोधून काढून त्याची पाच भारतीय पेटंट पब्लिश केल्याबद्दल वाईस चेअरमन माननीय पोपटराव डोरले यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित प्रसाद पाटील खजिनदार मिलिंद भिलवडे संचालक महावीर चौगुले प्रशांत अवधूत नितीन चौगुले व अजित फराटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किरण वाडकर यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.