१९ वर्षीय तरुणीवर तिच्या बहिणीसमोरच अत्याचार
दोन पोलिसांना अटक, निलंबनाचीही कारवाई
चेन्नई : खरा पंचनामा
एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. तामिळनाडुच्या तिरुवन्नामलाई इथं हा प्रकार घडलाय. दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीसमोरच दोन्ही पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी बायपास रोडवर पीडित तरुणी तिच्या बहिणीसोबत ट्रकमधून प्रवास करत होती. एंडल गावाजवळ आले तेव्हा पोलीस हवालदार सुंदर आणि सुरेश राज तिथं वाहनांची तपासणी करत होते. त्यांनी महिला प्रवास करत असलेला ट्रक अडवला. यानंतर तरुणीला एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला आणि सोडून दिलं.
पीडित तरुणी तिच्या बहिणीसोबत आंध्र प्रदेशातून तिरुवन्नामलाई इथं निघाली होती. सोमवारी मध्य रात्री त्यांची गाडी एंडल बायपास रोडवर पोहोचली तेव्हा तिथं दोन पोलीस कॉन्स्टेबलनी गाडी थांबवली. त्यांनी चौकशीसाठी दोन्ही बहिणींना गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर जवळच्या निर्जन जंगलात नेत १९ वर्षीय तरुणीवर तिच्या मोठ्या बहिणीसमोरच अत्याचार केले.
अत्याचारानंतर पोलिसांनी बहिणींना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला सोडलं. त्यावेळी जवळच विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी दोन्ही बहिणींना पाहिलं आणि रुग्णावाहिका बोलावली. दोघींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. पीडितेच्या जबाबानंतर तक्रारीवरून आरोपी पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही पोलीस हवालदारांना अटक केली असून दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.