निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून साडेतीन कोटींनी फसवणूक?
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
नागपूर : खरा पंचनामा
सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने शहरातील व्यावसायिकाची साडेतीन कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने दिड महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार केली आहे.
मात्र सीताबर्डी पोलिसांनी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.
सुनील बोंडे असे फसवणूक करणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त राहिलेले बोंडे हे सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी नागपुरात कार्यरत असताना शहरातील सुपर हायजिनेकी डिस्पोजल्सचे व्यावसायिक अतुल झोटींग यांच्याशी साडेतीन कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. मात्र त्यांनी ही रक्कम परत न केल्याने झोटींग यांनी सप्टेंबर महिन्यात बर्डी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्यावर तक्रार प्राप्त झाल्याचा शेराही दिला. मात्र या प्रकणात आतापर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.
आरोप असलेले पोलीस अधिकारी एका राजकीय पक्षाच्या खासदाराचा भाऊ आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव येत असल्याने गुन्हा दाखल करण्यात सिताबर्डी पोलीस टाळाटाळ करत आहेत. त्यमुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.