दिवाळीत सांगली पोलिसांचे नागरिकांना अनोखे 'गिफ्ट'
गहाळ झालेले 36.75 लाखांचे 147 मोबाईल, 5 लाखांचे दागिने नागरिकांना केले परत
सांगली : खरा पंचनामा
सांगली पोलीस दलाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना दिवाळीचे अनोखे 'गिफ्ट' दिले आहे. सायबर पोलीस विभागाने तांत्रिक माहितीच्या आधारे नागरीकांचे गहाळ झालेले 36 लाख 75 हजार रुपये किंमतीचे 147 महागडे मोबाईल व 6 लाख रुपयांचे 5 तोळयांचे सोन्याचे गंठण संबंधित मूळ मालकांना अधीक्षक घुगे यांच्याहस्ते परत करण्यात आले.
सायबर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे व पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे हे महागडे मोबाईल जप्त केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांच्यासह सायबरकडील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
इतक्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केल्याने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सायबर पोलिसांचे कौतुक केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.