दारूच्या नशेत गाडी चालवत पोलीस कॉन्स्टेबलने सहा गाड्यांना दिली धडक
पुणे : खरा पंचनामा
दारूच्या नशेत गाडी चालवत एका पोलीस कॉन्स्टेबलने अनेक जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. धक्कदायक म्हणजे याबाबत पुणे पोलिसांनी या पोलीस कॉन्स्टेबलवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र अखेर आज पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपाखाली पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हेमंत इनामे आहे.
पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी मधे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीत दारू पिऊन आले होते. या दारूच्या नशेत इनामे पुणे - नगर रस्त्यावरून जात होते. या दरम्यान त्यांनी सहा गाड्यांना धडक दिली. या धडकेत अनेकजण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल असलेल्या नागरिकांनी या नशेत असलेल्या कॉन्स्टेबल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होऊनही पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. तसेच आरोपी पोलीस कॉन्स्टेबलची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र आता पुणे ग्रामीण पोलिसांनी कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांना अटक केली आहे.
पुणे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामे यांनी रविवारी दारूच्या नशेत वाहन चालवत ५ ते ६ वाहनांना धडक दिली होत. या धडकेत अनेक जण गंभीर झाले. याप्रकरणी इनामे यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय हेमंत इनामे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात येणार असल्याचं पोलिस अधीक्षक गिल यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.