सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब
नवी दिल्ली : खरा पंचनामा
ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आज (दि. १४) सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे, असे वृत्त ANIने दिले आहे.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी संविधानातील कलम ३२ अंतर्गत 'हॅबियस कॉर्पस' (बंदी प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत झालेल्या अटकेला आव्हान दिले आहे.
२४ सप्टेंबर रोजी लडाखमधील लेह येथे स्वतंत्र राज्यासाठी आणि घटनात्मक संरक्षणा' साठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात सहभाग असल्याचा आरोप असलेले सोनम वांगचुक हे गेली १९ दिवस जोधपूर कारागृहात आहेत. त्यांना २६ सप्टेंबर रोजी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटक करण्यात आली होती.
या कारवाईविरोधात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी २ ऑक्टोबर रोजी संविधानातील कलम ३२ अंतर्गत 'हॅबियस कॉर्पस' (बंदी प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली होती. याचदिवशी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलं होतं की, "सात दिवस उलटूनही सोनम यांच्या तब्येती, स्थिती किंवा नजरबंदीच्या कारणांची माहिती मिळालेली नाही. त्यांनी वांगचुक यांच्यावर एनएसए लागू करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, गीतांजली अंगमो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता, कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि लेहचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले असून, त्याची प्रतही त्यांनी X वर शेअर केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.