जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...
कोल्हापूरच्या इंगळीतील प्रकार
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत एक अघोरी प्रकार घडला. गावातील कमानी जवळच जनावराचं काळीज पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवलं होतं. त्याच्या भोवती कुंकू, गुलाला आणि लिंबू ठेवण्यात आलं होतं. पहाटेच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस येताच गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
इंगळी गावाच्या कमानी जवळ हा भयंकर प्रकार उघडकीस आला. जनावराचं काळीज एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवलं होतं. त्या कापडाच्या भोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीचं पान ठेवलं होतं.
पहाटेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. कुणीतरी अघोरी पूजा केली असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंगळी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने गावात धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.
या अघोरी प्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पाच संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.