लक्ष्मीपूजनानंतर किरकोळ कारणाच्या वादातून तरुणाचा खून
जयसिंगपूर येथील प्रकार : हल्लेखोरांचा शोध सुरु
जयसिंगपूर : खरा पंचनामा
मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृपणे खून करण्यात आला. जयसिंगपूर येथे मध्यरात्री ही घटना घडली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. जुगार खेळताना हा खून झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस खुनाच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
सुनील किसन पाथरवट (वय ३१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण पाण्याच्या टाकीजवळ जुगार खेळत होते. त्यावेळी मृत सुनिलचा काही जणांशी वाद झाला. त्यातून तीन ते चार जणांनी त्याच्यावर पाठीमागून हल्ला केल्याची शहरात चर्चा आहे. शस्त्राचे वार मानेवर झाल्याने सुनील तेथेच कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. काही संशयितांशी चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.