Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारची टँकरला पाठीमागून धडक; धाराशिवचा एकजण जागीच ठार

कारची टँकरला पाठीमागून धडक; धाराशिवचा एकजण जागीच ठार

मिरज : खरा पंचनामा

रत्नागिरी-नागपूर एक्सप्रेस वेवर कळंबी (ता. मिरज) येथे कारने टँकरला पाठीमागून कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात धाराशिवमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

धाराशिवमधील एकजण कारमधून (एमएच 25 एडब्ल्यू 9906) एक्सप्रेस वेवरून धाराशिवकडे निघाला होता. कळंबी येथे राष्‍ट्रीय माहामार्गाच्या दुभाजकावर लावण्‍यात आलेल्या झाडांना पाणी घालण्‍यासाठी टँकर महामार्गावर उभा होता. या टँकरचा कार चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगाने असणारी कार टँकरवर आदळली. त्यानंतर कार महामार्गाच्या कडेला जावून पलटी झाली. यामध्‍ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत कार चालकाचे नाव समजू शकले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.