Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्यांवर चौघावर पंढरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई... 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्यांवर चौघावर पंढरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई... 
14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

माधवी गिरी गोसावी
सोलापूर : खरा पंचनामा

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अवैध सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या एकूण चार आरोपींवर विरुद्ध अन्न व औषधी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश मिळाले आहे. 

पंढरपूर वरून लक्ष्मी टाकळी रोडकडे जाणाऱ्या टेम्पो क्रमांक (एम.एच. 13 डी क्यू 1958) हा संशयारित्या जात असताना त्यास लक्ष्मी टाकळी रोड येथे पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू एकूण 30 पोत्यामध्ये भरलेली ते उघडून तपासणी केली असता एका पाकीटची किंमत हजार रुपये असे एकूण 30 पोते भरलेली सुगंधी तंबाखू एकूण किंमत रुपये नऊ लाख रुपये व टेम्पोची किंमत पाच लाख रुपये असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत ताब्यांत घेतला आहे. 

या प्रकरणी एकूण वाहन चालक सुनील गावडे (वय 30, रा. मोहोळ),  मालक सुनील दादा वसंत मोरे (रा. मोहोळ), गणेश पंडित (रा. पंढरपूर) तुकाराम माळी यांची नावे निष्पन्न झाली असून यांच्याविरुद्ध अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे भुसे यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अन्न व औषधी अधिनियम कायद्याप्रमाणे बी.एन एस कलम 328 प्रमाणे पोलीस ठाणेत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम  यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख, पीएसआय विक्रम वडणे, पोलीस हवालदार निलेश रोंगे, महेश कांबळे, विनायक नलावडे, संतोष गायकवाड, विनोद शिंदे, राहुल लोंढे हुलजंती आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.